बातमी कट्टा:- अट्टल दरोडेखोराला पकडण्यात शिरपूर पोलीसांना यश प्राप्त झाले असून चोपडा पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हा करुन संशयित फरार होता.शिरपूर फाट्यावरून त्याला ताब्यात घेण्यात शिरपूर पोलीसांना यश प्राप्त झाले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार चोपडा शहर पोलीस स्टेशन कडील दरोड्याचा गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी नामे अब्दुल इस्लाम मोहम्मद रफीक चौधरी रा.भंगार बजार धुळे हा शिरपूर फाटा येथे येत असल्याची गोपणीय माहिती प्राप्त झाली होती त्यावरून शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे शोध पथकाचे अमलदार यांनी आज दि ७ रोजी दुपारच्या सुमारास त्याच्या शोधासाठी शिरपूर फाटा येथे सापळा लावून त्याला ताब्यात घेतले.व चोपडा पोलीसांना संपर्क साधला असता चोपडा शहर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक घनश्याम तांबे व त्यांच्या पथकाच्या ताब्यात संशयिताला ताब्यात दिले.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे,यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ए.एस आगरकर यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक किरण बार्हे,हेड कॉस्टेंबल ललित पाटील, लादुराम चौधरी,पोलीस नाईक मनोज पाटील,प्रविण गोसावी व सचिन वाघ आदींनी कारवाई केली आहे.