बातमी कट्टा:- शिरपूर तालुक्यातील दहीवद येथे धाडसी घरफोडी झाल्याची घटना घडली आहे. सकाळी 6 वाजेपासून शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल होऊन चौकशी सुरु आहे.धुळे अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी,श्वान पथक घटनास्थळी दाखल होऊन चौकशी सुरु आहे.शेती विक्री केल्यानंतर मिळालेल्या लाखोंची रोकड चोरी झाल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर दहिवद गावातील नरेंद्र भगवान चव्हाण(पाटील) यांच्या बंद घरात घरफोडी झाल्याचे आज सकाळी उघड झाले आहे.घरासमोरील गेटचे कुलूप तोडून घराच्या दरवाजाचे कुलूप तोडत घरातील लॉकर मधील सुमारे लाखो रुपये चोरी झाल्याची घटना उघडकीस झाली आहे.नुकतीच शेती विक्री करुन पैसे घरात ठेवले होते असे सांगितले जात आहे. मात्र चोरांनी डाव साधत संपूर्ण लाखोंची रोकड चोरी झाल्याची घटना घडली आहे.घरफोडी झालेल्या गल्लीतील आणखी एका घराचे कुलुप तोडले असल्याचे निष्पन्न झाले असून मात्र त्या ठिकाणी कुठलीही चोरी झालेली नाही
आज पहाटे घटनेची माहिती प्राप्त होताच घटनास्थळी शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे सा.पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले असून चौकशी सुरु आहे.यावेळी फॉरेन्सिकचे पथक,श्वान पथक यांनी घटनास्थळी चौकशी केली आहे.सकाळी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांच बच्छाव व उपविभागीय पोलीस अधिकारी माने यांनी घटनास्थळी भेट देत चौकशी केली आहे.चोरी झाल्याची घटना समजताच घटनास्थळी गावकऱ्यांनी गर्दी केली होती.चोरीच्या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.पोलीसांकडून शोध सुरु असून जवळील सि.सि.टी.व्ही फुटेज देखील तपासणी करण्यात आली आहे.याबाबत पुढील कारवाई सुरु होती.
