
बातमी कट्टा:- पारोळा तालुक्यातील बोळे येथे दारु मुक्त घर दारु मुक्त गाव अभियानाअंतर्गत घेण्यात आलेल्या शिबीरात डॉक्टरांच्या औषधोपचार नंतर आठवड्याभरात अनेकांना फायदा झाला आहे.दि २५ रोजी रविवारी देखील या नशा मुक्ती शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
दि १८ रोजी पारोळा तालुक्यातील बोळे येथील ग्रामपंचायत प्रांगणात दारु मुक्त गाव दारु मुक्त घर अभियान राबविण्यात आले होते. या अभियानात मोफत व्यसनमुक्ती उपचार शिबिर घेण्यात होते.या शिबीरात १८० पेक्षा जास्त गरजूंनी सहभाग नोंदवला होता. व्यसनमुक्ती व मानसिक आरोग्य तज्ञ डॉ कृष्णा रामचंद्र भावले यांनी डॉ जितेंद्र गिरासे यांच्या रुग्णालयात मार्गदर्शन करत उपचार केले होते.डॉ कृष्णा भावले यांनी आजतागायत व्यसनमुक्ती व मानसिक आरोग्य संदर्भातील एक लाख रुग्णांवर उपचार केले आहेत.
कामानिमीत्त अमेरिका येथे असणारे कैलास गिरासे यांनी बोळे, ढोली, वेल्हाने,शेवगे आणि बोळे तांडा येथील युवाशक्ती च्या वतीने या नशा मुक्ती शिबीराचे बोळे गावात आयोजन केले होते.एक आठवड्याभरापूर्वी झालेल्या या शिबीरात दारु सोडण्यासाठी ज्यांनी औषधोपचार घेतले त्यातील अनेकांना शिबीराचा फायदा झाला आहे.दि २५ रोजी शिबीराचा दुसरा टप्पा बोळे येथे आयोजित करण्यात आल्याचे कैलास गिरासे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.