बातमी कट्टा:- गावात दारु विक्री होत असल्याने दारु विक्री विरोधात संतप्त महिला ग्रामपंचायत प्रांगणात एकत्र येत या गावात कित्येक वर्षांपासून दारु बंदी आहे यापुढे गावात दारुबंदी करावी असा सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला आहे.गाव परिसरात दारु विक्री केल्यास 50 हजारांचा दंड निश्चित करण्यात आला आहे.

शहादा तालुक्यातील खेडदिगर गावात महिलांनी दारु विक्री विरोधात ग्रामपंचायत प्रांगणात गर्दी केली होती.खेडदिगर गावात काही दिवसांपासून किरकोळ दारु विक्री होत होती यावर गावातील सर्व महिला एकत्र येत या दारु विक्री बाबत संतप्त होत ग्रामपंचायत गाठले.कित्येक वर्षांपासून गावात दारु बंदी असतांना काही दिवसांपासून गावात किरकोळ दारु विक्री सुरु झाली आहे.
महिलांनी दारु विक्री विरुध्दात एकत्र येत दारु विक्री करणाऱ्याला सुचना दिल्या व ग्रामपंचायत प्रांगणात गावात दारु बंदीचा ठराव करण्यात आला व गाव परिसरात दारु विक्री केल्यास सर्वानुमते 50 हजाराचा दंड निश्चित करण्यात आला आहे.
