बातमी कट्टा:- बनावट दारु कारखान्यावर पोलीसांनी छापा टाकून 9 संशयितांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 95 लाख 77 हजार 800 रुपये किंमतीचा मुद्देमाल व बनावट दारु तयार करण्यासाठी लागणारे साधने जप्त करण्यात आले होते.या प्रकरणातील मुख्य संशयित दिनेश गायकवाड ऊर्फ दिनु डॉन हा फरार होता.अखेर पोलीसांनी शिताफीने त्याला परभणी जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे.
दिनांक ०४ डिसेंबर २०२२ रोजी धुळे तालुका पोलीस स्टेशनचे पालिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना गुप्त बातमीदाराकडून ट्रक क्र. एम एच.४१ एयु २१२४ या वाहनामध्ये अवैधरित्या बनावट दारुची वाहतुक केली जात असल्याची माहिती मिळाल्याने पोनि दत्तात्रय शिंदे यांच्या पथकाने पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर ट्रकवर कारवाई केली असता सदर वाहनात रॉकेट देशी संत्रा नांव असलेली दारू मिळुन आल्याने एकुण ९५ लाख ७७ हजार ८०० रुपये किंमतीचा मुददेमाल आणि बनावट दारू तयार करण्याची साधने पोलीसांनी जप्त केली होती. त्यामुळे धुळे तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच सदर गुन्हयात सुमारे १० आरोपीतांचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झालेले होते. त्यापैकी सदर गुन्हयात ०९ आरोपीतांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली होती. तसेच नमुद गुन्हयातील मुख्य संशयित नामे दिनेश निबा गायकवाड ऊर्फ दिनु डॉन,रा. शिरुड, ता. जि. धुळे हा गुन्हा घडल्यापासून फरार होता.
पोनि दत्तात्रय शिंदे यांनी त्यांचे तांत्रिक कौशल्याचा व गोपनीयन माहितीचा वापर करून धुळे तालुका पोलीस ठाणेच्या तपास पथकातील पोलीस उप निरीक्षक अनिल सुभाष महाजन, प्रविण सदाशिव पाटील, उमेश पवार, कुणाल पानपाटील यांच्या पथकास वेळोवेळी तांत्रिक माहिती देवून सदर पथकाचे मदतीने नमुद गुन्हयातील मुख्य संशयित दिनेश गायकवाड ऊर्फ दिनु डॉन रा. शिरुड, ता. जि. धुळे याचा शोध सुरु ठेवला होता, तसेच सदर संशयित हा पुन्हा पुन्हा मोबाईल सीमकार्ड व मोबाईल बदलत असल्याने आणि त्याचा ठावठिकाणा नेपाळ, गोवा, उत्तरप्रदेश व बिहार आशा ठिकाणी थांबुन सतत बदलत असल्याने तो मिळुन येत नव्हता. तेव्हा पोनि दत्तात्रय शिंदे यांनी धुळे तालुका पोलीस स्टेशनचे वर नमुद पथकासह तांत्रिक तपासाचे आधारे सदर संशयित हा दि. २८ जून २०२३ रोजी गंगाखेड, जि. परभणी येथे असल्याचे तांत्रिक तपासात समजल्याने गंगाखेड शहरातील बस स्टॉप जवळील जगदंबा हॉटेल जवळ दि. २९ जून रोजी त्यास ताब्यात घेतले धुळे तालुका पोलीसांनी अटक केली आहे.
अशा प्रकारे नमुद गुन्हयातील मुख्य संशयित नामे दिनेश निंबा गायकवाड ऊर्फ दिनु डॉन रा. शिरुड, ता. जि. धुळे याचेकडे सखोल विचारपुस केली असता तसेच त्याचा अभिलेखाबाबत माहिती घेतली असता सदर संशयिताविरुध्द धुळे जिल्हयात तसेच राज्यात व इतर जिल्हयात देखील गंभीर स्वरुपांचे गुन्हे दाखल असल्याचे समजले असुन काही गुन्हयांमध्ये तो अदयाप फरार असल्याने धुळे तालुका पोलीसांनी दिनेश निंबा गायकवाड ऊर्फ दिनु डॉन रा. शिरुड, ता. जि. धुळे यास अटक केल्याने त्यामुळे त्याचेकडुन आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संजयजी बारकुंड ,अपर पोलीस अधीक्षक किशोरजी काळे, उप विभागीय पोलीस अधिकारी धुळे ग्रामिण विभाग साक्री साजन सोनवणे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी त्यांचे तांत्रिक कौशल्याचा व गोपनीय माहितीचा वापर करून धुळे तालुका पोलीस ठाणेच्या तपास पथकातील पोलीस उप निरीक्षक अनिल सुभाष महाजन,प्रविण सदाशिव पाटील, उमेश पवार, कुणाल पानपाटील यांच्यासह नमुद गुन्हयातील फरार संशयित दिनेश निया गायकवाड ऊर्फ दिनू डॉन रा. शिरुड, ता. जि. धुळे यास ताब्यात घेवून अटक केली आहे. सदर कारवाईचे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी कौतुक केले.

