बातमी कट्टा:- शहरातील गजबजलेल्या ठिकाणी दि 4 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास घराच्या दुसऱ्या मजल्यावर आगीने भडका घेतला.अचानक घराच्या दुसऱ्या मजल्यावरील घराला आग लागल्याने सर्वत्र धावपळ उडाली घटनास्थळी आग्नीशमन बंब व नागरीकांनी आग आटोक्यात आणली.
नंदुरबार शहरातील दादा गणपती परिसरातील देसाईपूरा भागातील राम मंदिराजवळ आज सायंकाळी 7:30 ते 8 वाजेच्या सुमारास मुरलीधर शहा यांच्या घराला आग लागली हळू हळू दुसऱ्या मजल्यावर देखील आगीने पेट घेतला. सायंकाळ पासूनच हवा सुरु असल्याने आगीचा मोठ्या प्रमाणात भडका झाला होता.
घटनास्थळी नागरिकांनी मदतकार्य सुरु करत अग्नीशमनचे दोन बंब दाखल झाले होत आगीवर नियंत्रण मिळवले होते. मात्र या आगीमुळे घरातील संपूर्ण मौल्यवान वस्तू जळून खाक झाल्या असून लाखोंचे नुकसान झाले आहे. घरात कोणीही नसल्याने सुदैवाने जिवीतहानी टळली आहे. गजबजलेल्या ठिकाणी शहराच्या मध्यभागी असलेल्या दादा गणपती परिसरात आग लागल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी बघावयास मिळाली. अग्निशमन बंब,पोलीस यंत्रणा व नागरिकांच्या सहकार्याने आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात आले.