
बातमी कट्टा:- दि शिरपुर मर्चंटस् को ऑप बँकेच्या संचालक मंडळाची मुदत चार महिन्यांपूर्वी संपल्यानंतर ही अद्याप नवीन , संचालक मंडळाची निवडणूक लावण्यासाठी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी सुरूवात केली नाही.म्हणून दि शिरपुर मर्चंटस् को-ऑप बँकेच्या नवीन संचालक मंडळ निवडणुकीची बँक बचाव समिती ने लेखी पत्र देऊन मागणी केली आहे .बँक बचाव समिती तर्फे अध्यक्ष मोहन साहेबराव पाटील आणि उपाध्यक्ष गोपाल कन्हैयालाल मारवाडी यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या धुळे कार्यालयात समक्ष भेटून या संदर्भात दि.2 जून रोजी लेखी पत्र देऊन मागणी केली.

