दुकानाचे शटर उघडत असतांनाच त्यांनी काही क्षणातच…

बातमी कट्टा:- दुकानाचे शटर उघडताच चोरट्यांनी काही क्षणातच 70 हजार किंमतीची बॅग घेऊन मोटरसायकलीने तिघेही चोरटे पसार झाल्याची घटना काल दि 26 रोजी सकाळी घडली. याबाबत पोलीस स्टेशनात तक्रार दाखल करण्यात आला आहे.

शिरपूर शहरातील बसस्थानक परिसरात सुनील चंदनमल जैन हे त्यांच्या रामदेव किराणा मर्चंट नावाचे दुकान उघडण्यासाठी दि 26 सकाळी 9 वाजेच्या सुमारास आले. त्यांनी दुकानाचे एक शटर उघडून हातातील बॅग दुकानात ठेवली व दुकानाचे बाजुचे शटर उघडण्यासाठी जाताच एका अज्ञात तरुणाने दुकानातील ती किंमती बॅग घेऊन बाहेर मोटरसायकलीवर असलेल्या दोघ साथीदारांसोबत शिरपूर फाट्याकडे पसार झाले.

दुकानाचे मालक असतांना भरदिवसा काही क्षणात डोळ्यासमोरुन तिन्ही संशयितांनी दुकानातील बॅग घेऊन धुमस्टाईल पसार झाल्याणी घटना घडल्याने दुकानदारांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.याबाबत सुनील जैन यांनी शिरपूर शहर पोलीस स्टेशना तक्रार दिली आहे.याबाबत पोलीसांकडून तपास सुरु आहे.

WhatsApp
Follow by Email
error: