
बातमी कट्टा:- शिरपुर -शहादा रस्त्यावर टेकवाडे फाटा ते भामपूर दरम्यान दुचाकीवरून जात असताना अचानक तोल गेल्याने तोरखेडा येथील अंगणवाडी सेविकेचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी उशिरा घडली असून शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मनीषा गोपाळ चौधरी वय 41 रा.तोरखेडा ता शहादा जी नंदुरबार असे मयत महिलेचे नाव आहे.

सदर महिला तिच्या पती गोपाळ चौधरी हे अमळनेर येथून शिरपुर शहादा रस्त्याने दुचाकीवरून तोरखेडा येथे जात असतांना टेकवाडे फाटा ते भामपूर फाटा दरम्यान भरीत सेंटर जवळ डुलकी आल्याने दुचाकीवरून अचानक तोल गेल्याने रस्त्यावर पडल्या.त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने पती यांनी खाजगी वाहनाने 8 वाजेच्या सुमारास उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉ.गुलाबराव पाटील यांनी तपासणी करून मयत घोषित केले. याप्रकरणी वार्डबॉय लखन गुसिंगेयांनी शहर पोलीस ठाण्यात खबर दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.पुढिल तपास पोना अनिल शिरसाठ करीत आहे.मृत महिलेचे सासर व माहेर तोरखेडा येथीलच असून अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत होते. अपघाताबाबत महिलेच्या नातेवाईकांना संशय आल्याने दवाखान्यात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने शिरपुर शहर पोलीस स्टेशनचे पीएसआय किरण बा-हे, संदिप मुरकुटे,पोहेकॉ लादूराम, चौधरी,पोना.अनिल शिरसाठ, अशोक धनगर, पोकॉ नरेंद्र शिंदे,स्वप्नील बांगर,गोविंद कोळी, मुकेश पावरा आदी कर्मचारी दाखल झाले होते. रात्री उशिरा अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
