बातमी कट्टा:- भरधाव रिक्षाचा तोल गेल्याने रिक्षा रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटली असून अपघातात दिड वर्षीय चिमुकलीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने चिमुकलीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दि २० रोजी सायंकाळच्या सुमारास घडली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार अकलाड मोराणे येथील करण सुरेश गायकवाड हे आपल्या पत्नी रुपाली सुरेश गायकवाड व मुलगी सायरा करण गायकवाड आणि भाऊ सोबत शिरपूर येथून आपल्या गावी परत येत होते.यावेळी ते बोरीस मेहरगाव रस्त्यावर एम एच ४१ व्हि ३२२५ क्रमांकाची चालक सुरेश पुंडलीक महाजन यांच्या रिक्षाने शिंदखेडाहून अकलाड मोराणे गावाकडे येत असतांना यादरम्यान रिक्षाचा तोल गेल्याने रिक्षा रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटली.या रिक्षात बसलेली सायरा करण गायकवाड या दिड वर्षीय चिमुकलीचा रिक्षाखाली दबुन डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झाला तर ईतर प्रवासी किरकोळ जखमी झाले.याबाबत सोनगीर पोलीस स्टेशनात नोंद करण्यात आली आहे.