दुर्दैवी घटना,अपघातात माय-लेकीचा मृत्यू…

बातमी कट्टा:- मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवर झालेल्या भीषण अपघातात माय लेकीचा मृत्यू झाल्याची घटना दि ११ रोजी रात्रीच्या सुमारास घडली.बिजासन मातेचे दर्शन घेऊन मोटरसायकलीने परतांना रस्त्यावर खड्ड्यामुळे हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार चोपडा येथील मनोज शिंदे हे आपल्या पत्नी सुलोचना मनोज शिंदे व दोन वर्षीय मुलगी नेहल मनोज शिंदे यांच्यासोबत मोटरसायकलीने बिजासन माता मंदीरावर दर्शनासाठी गेले होते.सायंकाळी दर्शन घेऊन परत येत असतांनाच मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवरील पळासनेर गावाजवळ असलेल्या खड्ड्याजवळ मनोज शिंदे यांनी मोटरसायकल हळू केल्याने मागून येणाऱ्या वाहनाने मोटरसायकल सुलोचना शिंदे आणि मुलगा नेहल शिंदे रस्त्यावर कोसळले. यादरम्यान मागून येणाऱ्या अज्ञात भरधाव वाहनाने नेहल शिंदे आणि सुलोचना शिंदे यांना चिरडल्याने यात नेहलचा जागीच मृत्यू झाला तर सुलोचना शिंदेंच्या दोन्ही पायांवरुन वाहन गेल्याने गंभीर जखमी झाले.घटनेची माहिती मिळताच मृत्यूंजयदूत लकी जाधव आणि शिरपूर तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल होत मदतकार्य करण्यात आले. रुग्णवाहीकेच्या मदतीने पती पत्नीसह मुलीला शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले.यावेळी उपचारादरम्यान सुलोचना शिंदे यांचा देखील मृत्यू झाला. यावेळी मनोज शिंदे यांनी एकच आक्रोश केला.

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे हा अपघात झाल्याने शिरपूर फर्स्ट संघटनेचे संपूर्ण पदाधिकारी पळासनेर येथे घटनास्थळी गेले.यापूर्वी देखील खड्ड्यांमुळे याठिकाणी अनेकदा अपघात घडले आहेत.खड्यांमुळे अनेकांनी आपला जिव गमावला असतांना मात्र टोल प्रशासन मुग गिळून गप्प बसले आहे.खड्यांमुळे आणखी किती लोकांचा अपघात होऊन जिव जाण्याची वाट बघत बसले टोल प्रशासन ? असा प्रश्न येथील जनता उपस्थित करत आहे.

WhatsApp
Follow by Email
error: