दुसऱ्या स्तराचे निर्बंध पुढील आदेशापर्यंत कायम

बातमी कट्टा:- नंदुरबार जिल्ह्यातील कोविड बाधीत रुग्णाचा आठवड्याच्या सरासरी पॉझिटिव्हीटी रेट हा 3.13 टक्के असून ऑक्सिजन बेडस व्यापलेली टक्केवारी 3.43 इतकी असल्याने नंदुरबार जिल्हा पहिल्या स्तरामध्ये अंतर्भुत होत असला तरी कोविड-१९ विषाणूचा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता ५ जून २०२१ च्या आदेशान्वये घालण्यात आलेले दुसऱ्या स्तराचे निर्बंध २१ जून २०२१ पासून पुढील आदेश होईपर्यंत कायम ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत.

आस्थापना, नागरिक यांना शासनाकडून तसेच स्थानिक प्राधिकारणाकडून यापुर्वी वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले कोविड-१९ बाबत मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील. ज्या व्यक्ती, आस्थापना, घटक या कोविड-१९ बाबत सूचनांचे पालन करणार नाहीत त्या यापूर्वीच्या निर्देशानुसार दंडास पात्र राहतील.

या आदेशाचे पालन न करणाऱ्या विरूद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, साथ प्रतिबंधक कायदा १८९७,फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ व भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८ नुसार कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

WhatsApp
Follow by Email
error: