देशसेवा करण्यापूर्वीच नियतीचा घात,सैन्य भरतीसाठी जातांना अपघातात तरुणाचा मृत्यू…

बातमी कट्टा:- देशसेवेचे स्वप्न घेऊन अग्निवीर सैन्य भरतीसाठी जात असतांना भरधाव वेगाने येणाऱ्या रेल्वेने धडक दिल्याने 20 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.मळमळ होऊ लागल्याने उलट्या करण्यासाठी रेल्वे रुळावर वाकून उलटी करीत असतांनाच रेल्वेने धडक दिली.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार धुळे तालुक्यातील वडजाई येथील रामेश्वर भरत देवरे वय 20 हा आपल्या मित्रांसोबत केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अग्निवीर सैन्य भरतीसाठी मुंबईतील मुंब्रा जाण्यासाठी निघाला होता. सर्वजण चाळीसगावहून मुंबई रेल्वेने काल दि 21 रोजी सकाळच्या सुमारास कल्याण येथे पोहचले तेथून ते मुंब्रा येथे अग्निवीर सैन्यभरतीसाठी जाणार होते.

यादरम्यान रेल्वे प्लॅटफॉर्म वर रामेश्वर देवरे याला मळमळ होऊ लागल्याने त़ उलटी करण्यासाठी रेल्वे रूळाकडे वाकून उलटी करी असतांनाच भरधाव आलेल्या रेल्वेने त्याला जोरदार धडक दिल्याने तो दुरपर्यंत फेकला गेल्याने त्याचा जागिच मृत्यू झाला.

WhatsApp
Follow by Email
error: