बातमी कट्टा:- दोनशे रुपयांची लाच स्विकारतांना ट्राफिक पोलीसाला लाचलुचपत विभागाच्या धुळे पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले असून शहर पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मोटरसायकल चालकाकडून दोनशे रुपयांची लाच स्विकारतांना अटक करण्यात आली आहे.
तकारदार हे चाळीसगांव येथील रहीवाशी असुन त्यांचे मोटारसायकलवर धुळे येथे नेहमी येणे जाणे असते. धुळे शहरात मोटारसायकल ने प्रवास करतांना त्यांना तहसिल चौकात तसेच अॅगलो उर्दु हायस्कुल जवळ ड्युटीस असलेले ट्राफिक पोलीस त्यांना विनाकारण अडवुन त्यांचे कडे डायव्हिंग लायन्सस असतांना देखील या ना त्या कारणांने त्यांच्या कडे २०० ते ५०० रूपायाची मागणी करून त्यांच्या मागणी प्रमाणे पैसे दिले नाही तर ट्राफिक पोलीस त्यांना जावु देत नाहीत. व त्यांच्या वाहनांवर मोठया रक्कमेचा ऑनलाईन दंड आकारण्याचे सांगत असत. तक्रारदार यांना तेथे ड्युटीस असलेल्या टाफिक पोलीसांचा नेहमीचा व पैसे वसुलीचा त्रास होत असल्याने त्यांनी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दि.०२.०५.२०२३ रोजी सदर लाच मागणीच्या बाबत तक्रार दिली होती.
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीची आज दि. ०३.०५.२०२३ रोजी पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान धुळे शहरात जुना आग्रा रोड लगत अग्लो उर्दु हायस्कुल समोरील रस्त्यावर पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश दिनकर सुर्यवंशी यांनी तक्रारदार यांना थांबवुन त्यांचे कडे वाहनांवर ऑनलाईन दंड नको असेल तर २०० रूपये दयावे लागतील अशी २००रू लाचेची मागणी करून सदर २०० रुपये लाचेची रक्कम स्वतःसाठी धुळे शहरातील अग्लो उर्दू हायस्कुल समोरील रस्त्यावर स्विकारतांना त्यांना आज रोजी रंगेहात पकडण्यात आले असुन यांचे विरूध्द धुळे शहर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे तसेच राजन कदम, शरद काटके, भुषण खलाणेकर संतोष पावरा, गायत्री पाटील, भुषण शेटे, रामदास बारेला, वनश्री बोरसे, रोहीणी पवार प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रविण पाटील, जगदीश बडगुजर, सुधीर मोरे, यांनी केली आहे.
सदर कारवाईस नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक नारायण न्याहाळदे व वाचक पोलीस अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शन लाभले आहे.सदर गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.