दोन घरफोड्यांसह तीन दुकानांमध्ये चोरी….

बातमी कट्टा:- दोन दिवसात शहरातील दोन घरफोड्यांसह तीन दुकानातून चोरी झाल्याची घटना घडली आहे.याबाबत मात्र अद्यापावेतो कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. यात दोन घरांसह एक पानटपरी,व तीन दुकानावर चोरट्यांनी हातसफाई केली आहे.

शिरपूर शहरातील शंकर पांडू माळी नगरमध्ये मंगळवारी 7 डिसेंबर रोजी रात्री दोन बंद घरात घरफोडी झाल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली तर गुरुवारी 8 रोजी एस्सार पेट्रोलपंपलगत पानटपरीसह परिसरातील 3 दुकानात अज्ञात चोरट्यांनी हातसफाई केली आहे.याबाबत मात्र अद्याप शिरपूर शहर पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

दि 7 रोजी रात्रीच्या सुमारास शहरातील करवंद नाका परिसरातील शंकर पांडू माळी नगरात फकीरा नथ्‍थु माळी व बंडू नारायण माळी यांच्या बंद घराचा कडीकोंडा तोडून प्रवेश करून कपाट,कपाटचे कप्पे,डब्बे आदीची तपासणी केली.मात्र त्यांना काही चोरून नेण्यासारखे साहित्य मिळून आले नसल्याने चोरटे खाली हात परतले.घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे पीएसआय किरण बा-हे हे पथकासह घटनासह दाखल होऊन पाहणी करून पंचनामा केला.मात्र याबाबत अधिकृतपणे सायंकाळ पर्यत कुठलीही तक्रार दाखल झालेली नाही.तर आज दि 9 रोजी सकाळी शिरपूर शहरातील एस्स.आर पेट्रोल पंप जवळील पानटपरीसह ईतर तीन दुकानांवर देखील चोरट्यांनी डल्ला मारल्याचे उघडकीस आले असून याबाबत देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

WhatsApp
Follow by Email
error: