
बातमी कट्टा:- शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती मधील गुरांच्या बाजारातून चक्क दोन बैल चोरी झाल्याची घटना दि 10 रोजी घडली आहे.याबाबत बैलजोडी मालकाने शिरपूर शहर पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस स्टेशनात मुन्नीराम खुमसिंग पावरा वय 46 रा.ढाबापाडा ता.शिरपूर यांनी फिर्याद दिली आहे.मुन्नीराम पावरा हे बैल खरेदी विक्री करतात.चार महिन्यांपूर्वी त्यांनी दोन पांढऱ्या रंग बैल विकत घेतले होते.महिन्याभरापूर्वी त्यातील एक बैल त्यांनी शिरपूर गुरांच्या बाजारात विक्री साठी आणला होता.मात्र भाव भेटत नसल्याने तिथेच बैल बांधून ठेवत होते.10-15 दिवसांनी पुन्हा दुसार बैल त्यांनी गुरांच्या बाजारात विक्रीसाठी आणला.मात्र बैलजोडीला योग्य भाव भेटत नसल्याने बैलजोडी बांधून मुन्नीराम घरी गेले.दि 9 रोजी दुपारी 12:30 परत आल्यानंतर बैलजोडीला जागेवर चारापाणी केली आणि पुन्हा घरी निघून गेले.दि 10 रोजी सकाळी 7 वाजता त्यांना जागेवर बैलजोडी नसल्याचा फोन आला.मुन्नीराम मित्रांसोबत शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुरांच्या बाजारात गेले असता त्यांना त्यांचे दोन्ही बैल मिळुन आले नाही.संपूर्ण शोध घेऊन देखील बैल मिळाला नसल्याने मुन्नीराम पावरा यांनी 60 हजार किंमतीचे दोन्ही बैल चोरी झाल्याचे फिर्याद दिली असून अज्ञातांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.