
बातमी कट्टा:- शिरपूर तालुक्यातील तऱ्हाडी गावाजवळील शिरपूर शहादा रस्त्यावर दोन मोटरसायकलींचा अपघात झाला.यावेळी तऱ्हाडी गावात प्रचारासाठी आलेले अपक्ष उमेदवारी डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांनी धाव घेत जखमी वाहन चालकाची चौकशी केली.
विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे.उमेदवार प्रचारात व्यस्त आहेत.शिरपूर विधानसभेचे अपक्ष उमेदवार डॉ जितेंद्र ठाकूर यांचा आज शिरपूर तालुक्यातील तऱ्हाडी गावापासून प्रचाराला सुरुवात झाली.यावेळी डॉक्टर जितेंद्र ठाकूर प्रचार करत असतांनाच शिरपूर शहादा रस्त्य्यावर दोन मोटरसायकलींचा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच प्रचार सोडून डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांनी घटनास्थळी धाव घेतली.त्यात किरकोळ जखमी झालेले मोटरसायकल चालकांची डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांनी चौकशी केली. डॉ जितेंद्र ठाकूर उच्चशिक्षित डॉक्टर असल्याने त्यांनी तात्काळ प्रचार सोडून घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केल्याचे बघून ग्रामस्थांनी डॉ जितेंद्र ठाकूर यांचे कौतुक केले.
