
बातमी कट्टा:- चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी आलेल्या मध्यप्रदेश राज्यातील 16 वर्षीय विधीसंघर्षग्रस्त बालकाला पोलीसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या चौकशीतून सहा मोबाईल व दोन मोटरसायकली ताब्यात घेण्यात आले आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर शहर पोलीस स्टेशनात दि 19 मे रोजी शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथून मोबाईल चोरीची फिर्याद दाखल करण्यात आली होती.त्या गुन्ह्या बाबत चौकशी सुरु असतांना पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना गोपणीय माहिती प्राप्त झाली होती.त्या माहितीच्या आधारे शोध सुरु असतांना शहरातील करवंद नाका येथे मध्यप्रदेश राज्यातील बेलघाट ता.वरला जि.बडवाणी येथील विधीसंघर्षग्रस्त बालक चोरी केलेले मोबाईल लोकांना विक्री करण्यासाठी आग्रह करत असतांना मिळून आला.पोलीसांनी त्याची चौकशी केली असता त्याच्या ताब्यातून सहा मोबाईल आणि दोन चोरीच्या मोटरसायकली पोलीसांनी ताब्यात घेतला आहे.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, शोध पथकाचे ललित पाटील, लादुराम चौधरी,गोविंद कोळी,विनोद अखडमल,प्रविण गोसावी,मुकशे पावरा,मनोज दाभाडे व प्रशांत पवार आदींनी कारवाई केली आहे.
