बातमी कट्टा:- धारदार शस्त्र विळ्याने मानेवर व पोटात वार करुन 32 वर्षीय व्यक्तीचा खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याबाबत संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले असून चौकशी सुरु आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार धुळे तालुक्यातील जापी शिवारातील कापडणे पाटचारी जवळ जापी शिवारात असलेल्या युवराज निंबा ठाकरे यांच्या शेतात सकाळी 8 वाजता एकाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत या घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील,सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोते,पोलीस उप निरीक्षक सागर काळे तसेच एलसीबीचे प्रभाकर बैसाने,श्रीकांत पाटील,पोलीस पाटील मनोज गुजर तसेच सरपंच भैय्या पाटील यांच्यासह ग्रामस्थ देखील घटनास्थळी ठिकाणी दाखल झाले.यावेळी राजेंद्र रामसिंग बारेला पावरा वय 32 यांचा धारदार शस्त्राने विड्याने मानेवर व पोटात जखमा करून खून केल्याची घटना घडल्याचे निदर्शनास आले.याबाबत पोलिसांनी संशयित काशीराम चिलख बारेला,पावरा राहणार हटवडी पानसमेल याला ताब्यात घेतले असून घटनेची माहिती मिळताच या ठिकाणी ठसे तज्ञ यांना पाचारण करण्यात आले होते.या घटनेचा पुढील तपास सुरु असल्याची माहिती पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी दिली आहे.खूनामागील कारण मात्र समजू शकलेले नाही.