बातमी कट्टा:- धुळे महानगरपालिकेच्या महापौर पदी प्रतिभा चौधरी यांची निवड निश्चित करण्यात आली आहे. याबाबत औपचारिक घोषणा बाकी आहे. महपौर पदी प्रतिभा चौधरी यांचा एकम अर्ज दाखल झाल्याने बिनविरोध निवड झाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार धुळे महानगरपालिकेच्या महपौर पदासाठी प्रतिभा चौधरी यांचा एकमेव अर्ज दाखल असल्याने त्यांची महापौर पदावर बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.याबाबत फक्त औपचारिक घोषणा बाकी आहे.तर महिला बालकल्याण समितीच्या सभापती पदी सारिका अग्रवाल तर स्थायी समिती निवडणूकीतही भाजपाच्या किरम कुलेवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.तीन ही जागांसाठी एकही अर्ज दाखल न झाल्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली आहे.