
बातमी कट्टा:- धुळे एमआयडीसी मधील एका कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.सरकी तेल उत्पादक कंपनीला आग लागल्याने आगीने रौद्ररूप धारण केले आहे.या आगीत सुमारे चार ते पाच कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. धुळे, पारोळा, अमळनेर, शिरपूर मालेगाव येथील अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्यासाठी मदतकार्य सुरु आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार धुळे शहरालगत असलेल्या धुळे एमआयडीसी मधील मधूर सरकी तेल उत्पादक कंपनीला अचानक आग लागली.सदर आगीने काही वेळेत रौद्ररूप धारण केले.या आगीत कंपनीतील सरकीच्या गाठी व बारदान जळून खाक झाले आहेत.सुदैवाने आज कंपनीला सुट्टीला असल्याने कोणीही मजूर कंपनीत नव्हते.त्यामुळे जिवीतहानी झालेली नाही.आगीची परिस्थिती बघता आग रात्रभर विझणार नसल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे घटनास्थळी पोलिस यंत्रण दाखल झाली असून धुळे, पारोळा, अमळनेर, शिरपूर मालेगाव येथील अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्यासाठी मदतकार्य सुरु आहे.आगीचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही.
