बातमी कट्टा:- धुळे जिल्ह्यात थंडीत वाढ झाली आहे. जिल्ह्यातील वातावरणात गारवा जाणवत आहे.आज 5 अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. थंडीचा गारठा वाढल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
धुळे जिल्ह्यात वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी व शेतकऱ्यांनी पशुधनाची काळजी घ्यावी व त्यासाठी स्थानिक हवामानाच्या अंदाजाची अद्ययावत माहिती ठेवावी असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे.तर जिल्ह्यात वाढत्या थंडीच्या लाटेपासून वाचण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन देखील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने देखील करण्यात आले आहे.थंडीचा गारठा वाढल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून घराबाहेर पडणे मुश्कील झाले असून आरोग्यावर त्याचा परिणाम जाणवत असून जेष्ठांना याचा प्रचंड त्रास होत आहे.रब्बी पिकांना पाणी भरण्यासाठी शेतकऱ्यांचे हाल होत आहेत.जागोजागी शेकोटीचा आधार घेतला जात आहे.तर वाढती थंडी बघता शाळेच्या वेळेत बदल करण्याची मागणी करण्यात येत आहे.