धुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीसाठी शिवसेनाने कंबर कसली…

बातमी कट्टा:- धुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी शिवसेनेने कंबर कसली असून मायक्रो प्लानिंग केल्यास निश्चितच यश मिळेल,असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांनी येथे व्यक्त केला आहे. नरडाणा आणि शिरपूर येथे हेमंत साळुंखे यांच्या उपस्थितीत पदाधिकारींची बैठक आयोजित करण्यात आली होती.


धुळे जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणुकी च्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हेमंत साळुंखे यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली.यावेळी पक्ष जो उमेदवार उभा करेल त्या उमेदवाराला निवडुन आणण्याची जबाबदारी पदाधिकारी म्हणुन पार पाडू असा सुर बैठकीत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. यावेळी बोलतांना श्री.साळुंके म्हणाले की होऊ घातलेल्या निवडणूकीसाठी आजपासूनच कामाला लागावे लागणार आहे.त्यासाठी सुक्ष्म प्लानिंग करावे लागेल. महाविकास आघाडीच्या माध्यमातून येणाऱ्या निवडणुका लढवल्या जातील.त्यासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरु आहे.एक दिलाने काम केल्यास यश नक्कीच मिळेल,असे श्री.साळुंके यांनी बोलतांना सांगितले.


याप्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी यांनी आपले मत व्यक्त केले.11 वाजता नरडाणा येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली तर 1 वाजता शिरपूर येथे शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली आहे.

WhatsApp
Follow by Email
error: