
बातमी कट्टा:- धुळे जिल्ह्यातील यंदाच्या उन्हाळ्यातील आज सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे.आज जिल्ह्यात तापमानाने ४० अंशाचा टप्पा पार केला असून ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.काही दिवसांपासून जिल्ह्यात सतत तापमानात वाढ होत असल्याने उन्हाच्या झळा आणखीनच तीव्र झाल्या आहेत.

गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात तापमानाची वाढ होत असल्याने नागरिक उकाड्यापासून त्रस्त झाले आहेत.पहाटे गारवा जाणवत असला तरी दिवस भर उन्हाच्या झळा बसत आहेत. दुपारी उन्हाच्या झळा असह्य वाटत असल्याने नागरिक घराबाहेर निघणे टाळत आहेत.वाढत्या तापमाना मुळे दुपारच्या सुमारास शहरात शांतता बघावयास मिळत आहे.गर्मीमुळे नागरिक हैराण झाले आहेत.हवामान विभागाने आज ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद केली आहे.धुळे जिल्ह्यातील यंदाच्या उन्हाळ्यातील आज सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
