बातमी कट्टा:- राज्यात व धुळे जिल्ह्यात पुढच्या 5 ते 8 ऑक्टोबर2021 या दिवसात काही ठिकाणी गडगडाटासहीत जोरदार पावसाची शक्यता असल्याची भारतीय हवामान खात्याने पूर्वसूचना प्रसारित करत ऍलो अलर्ट दिलेला आहे.
तरी धुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना व यंत्रणांना सतर्कततेचा इशारा देण्यात येत आहे. याकाळात ढगांच्या गडगडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता राहील.
👉त्याअनुषंगाने नागरिकांनी शेतात काम करताना झाडाखाली थांबू नका.
👉 विजा चमकत असताना विद्युत खांब, झाड, पाणी, लोखंडी वस्तू, साहित्य यापासून सुरक्षित अंतर ठेवावे.
👉 कच्या घरातील नागरिकांनी छप्पर व हलक्याफुलक्या वस्तूंची काळजी घ्यावी. त्या उडून नुकसान होऊ शकते.
👉अधिक माहिती व मदतीसाठी जवळच्या तहसील कार्यालय व पोलीस ठाण्यात संपर्क साधावा.
👉कोणत्याही घटनांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष व जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षास द्यावी.