धुळे महानगरपालिकेत भाजपचे बहुमत सिध्द,महापौर पदी प्रदिप कर्पे…

बातमी कट्टा:- धुळे महापौर पदासाठी आज दि 17 रोजी विशेष महासभा संपन्न झाली यात धुळे महानगरपालिकेत भाजप पक्षाचे प्रदिप कर्पे यांना 73 पैकी 50 बहुमत मिळाले आहे यामुळे महापौर पदी प्रदिप कर्पे यांची निवड झाली आहे.

धुळे महानगरपालिकेच्या महापौर पदी कोणाणी निवड होते याकडे धुळेकरांचे लक्ष लागले होते भाजपकडे जरी स्पष्ट बहुमत होते तरी महाविकास आघाडी यात काही मास्टरमाइंड खेळी करु शकते अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. जळगाव महानगरपालिकेतील दगाफटका लक्षात घेत भाजपने धुळ्यातील पक्षाच्या नगरसेवकांना दमण नेले असल्याचे सांगितले जात होते.

धुळे महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी आज 73 नगरसेवकांच्या या महानगरपालिकेत पन्नास नगरसेवकांनी भाजपचा स्पष्ट बहुमत सिध्द करत भाजपचे प्रदिप कर्पे यांना संधी दिली आहे.तर एम .आय.एम पक्षाचे सईदा अन्सारी यांना 4 मते तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मदिना समशेर पिंजारी यांना 17 मते मिळाली तर शिवसेनेच्या ज्योत्स्ना पाटील या तटस्श राहिले तर ईतर दोन नगरसेवकांनी तटस्थ भुमिका बजावली आहे.

जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली महापौर पदाची निवड प्रक्रिया संपन्न झाली आहे. या निवडणुकीत भाजपचे 50 मते स्पष्ट बहुमत मिळाल्याने प्रदिप कर्पै यांची महापौर म्हणून घोषित करण्यात आले आहे.

WhatsApp
Follow by Email
error: