#धुळे मार्केट मधील दुकानाला भीषण आग…

बातमी कट्टा:- धुळे शहरातील शंकर मार्केट मधील कापड दुकानाला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आगीचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही. घटनास्थळी अग्निशमन बंब दाखल झाले असून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार धुळे शहरातील पाचकंदील परिसरात असलेल्या शंकर मार्केट येथील कापड दुकानाला भीषण आग लागली.या आगीने रौद्ररूप धारण केले आहे.याआधी देखील याच शंकर मार्केटला आग लागली होती.घटनास्थळी अग्निशमन बंब दाखल झाले असून आग विझविण्यासाठी मदतकार्य सुरु आहे तर मार्केट परिसरातील इतर दुकानांमधील माल बाहेर काढण्यास दुकानदारांनी सुरुवात केली आहे.या आगीचे नेमके कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

WhatsApp
Follow by Email
error: