धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई,एलसीबीचे पोलिस निरीक्षकसह दोन हवलदार ताब्यात..

बातमी कट्टा :- धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मोठी कारवाई केली असून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक यांच्यासह दोन पोलिसांना १ लाख ५० हजार रुपयांची लाच स्विकारल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाने ताब्यात घेतले आहे.

तक्रारदार यांचेवर प्रतिबंधक कारवाई न करण्यासाठी धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी तक्रारदार यांच्याकडून दोन लाख रुपये लाचेची रक्कम स्वीकारण्यास संमती दर्शवून सदरची रक्कम स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस नितीन आनंदराव मोहने व अशोक साहेबराव पाटील यांना देण्यास सांगितले. सदर लाच रक्कमे बाबत तक्रारदार यांनी पोलिस नितीन मोहने व अशोक पाटील यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी तडजोडीअंती एक लाख ५० हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य करून पंचांसमक्ष वरील लाच रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.

याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे,पोलिस नितीन आनंदराव मोहने व अशोक साहेबराव पाटील यांच्या विरुद्ध दोंडाईचा पोलीस स्टेशन जिल्हा धुळे येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तिघांना ताब्यात घेतले आहे.

WhatsApp
Follow by Email
error: