धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई,दोन पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल,एक ताब्यात,दुसरा फरार…

बातमी कट्टा:- अपघातातील गुन्ह्यात तक्रारदार यांना अटक करु नये म्हणून ३० हजारांची लाचेची मागणी करुन तडजोडीअंती १५ हजारांची लाच स्विकारतांना पारोळा पोलिस हवालदाराला धुळे लाचलुचपत विभागाने रंगेहाथ ताब्यात घेतले आहे याप्रकरणी दोन पोलिस हवालदार विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार हे दि. 7 नोव्हेंबर 2024 रोजी मोटार सायकल ने पारोळा ते धरणगाव रस्त्यावर जात असतांना त्यांच्या मोटारसायकलची समोरून येणाऱ्या मोटरसायकलशी धडक होऊन त्यामध्ये समोरील मोटोरसायकल वरील इसम मयत झाल्याने तक्रारदार यांचेविरुद्ध पारोळा पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यात तक्रारदार यांना अटक न करणेकरीता हिरालाल देविदास पाटील वय- 43 वर्ष,पोलिस हवालदार पारोळा पो.स्टे.रा.प्लॉट. नं.66, हरिओम नगर, गळवाडे रोड, अमळनेर ता.अमळनेर जि.जळगाव व प्रवीण विश्वास पाटील, वय.45 वर्ष रा. पोलीस लाईन, बसस्थानकाजवळ, पारोळा ता.पारोळा जि.जळगाव यांनी तक्रारदार यांच्याकडे ३० हजार रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रारदार यांनी तक्रार दिली होती.सदर तक्रारीची पंचासमक्ष पळताळणी केली असता पोलिस हवालदार हिरालाल पाटील यांनी तक्रारदार यांचेकडे 30 हजार रूपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती 15 हजार रुपये तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केली.पोलिस हवालदार हिरालाल पाटील यांनी त्यांच्या मोबाईलवरून प्रविण पाटील यांना फोन करून तक्रारदार यांच्याशी बोलणे करण्यास दिले असता पोलिस प्रविण पाटील यांनी तक्रारदार यांना पोलिस हवालदार हिरालाल पाटील यांच्याकडे लाचेची रक्कम देण्यास सांगितली त्याप्रमाणे पोलिस हवालदार हिरालाल पाटील यांनी तक्रारदार यांचेकडून लाचेची रक्कम स्वीकारली म्हणून हवालदार हिरालाल पाटील यांना रंगेहाथ पकडण्यात आले असून पोलिस हवालदार प्रविण पाटील फरार असल्याने त्यांचे विरुद्ध पारोळा पो.स्टे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.

सदरची कारवाई धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उप अधीक्षक सचिन साळुंखे,पोलिस निरीक्षक पंकज शिंदे तसेच पथकातील राजन कदम,मुकेश अहीरे,संतोष पावरा,प्रवीण मोरे,रामदास बारेला, प्रविण पाटील,सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक श्रीमती शर्मीष्ठा घारगे वालावलकर,अप्पर पोलिस अधीक्षक माधव रेड्डी व वाचक पोलिस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे‌.

WhatsApp
Follow by Email
error: