
बातमी कट्टा:- तक्रारदार हे शिरपुर येथील रहिवासी असुन मौजे वरवाडे शिरपुर येथे त्यांचे घराचे बांधकाम सुरु असुन सदर ठिकाणी तक्रारदार यांच्या घराच्या विज पुरवठयाच्या वायरचा अडथळा येत असल्याने सदरची वायर दुसऱ्या खांब्यावरुन जोडुन मिळणेकरीता तक्रारदार यांनी महावितरण कंपनी उपविभाग, शिरपुर कार्यालयात जावुन वरिष्ठ तंत्रज्ञ जितेंद्र धोबी यांची भेट घेवुन त्यांना त्यांच्या विज पुरवठयाची वायर दुसऱ्या खांब्यावरुन जोडुन देणेबाबत विनंती केली असता त्यांनी दुसऱ्या खांब्यावरुन वायर जोडुन देण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडे ५००/- रुपये लाचेची मागणी केल्याने तक्रारदार यांनी दि. ०८.०१.२०२५ रोजी दुरध्वनी व्दारे ला.प्र. विभाग धुळे कार्यालयास माहिती दिली होती.
त्यावरुन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे विभागाच्या पथकाने दि.०९.०१.२०२५ रोजी शिरपुर येथे जावुन तक्रादार यांची तक्रार नोंदवुन सदर तक्रारीची पंचांसमक्ष पडताळणी केली असता वरिष्ठ तंत्रज्ञ जितेंद्र धोबी यांनी तक्रारदार यांच्याकडे तडजोडीअंती ४००/- रुपये लाचेची मागणी करुन दिनांक १०.०१.२०२५ रोजी सदर लाचेची रक्कम स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहात पकडण्यात आले असुन त्यांचेविरुध्द शिरपुर शहर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, पोलीस निरीक्षक पंकज शिंदे तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, प्रविण मोरे, मकरंद पाटील, प्रविण पाटील, रामदास बारेला, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आली असुन गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.
