बातमी कट्टा:- परराज्यातून मुंबई कडे सुगंधीत तंबाखू वाहतूक करणाऱ्या चार कंटेनरवर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. या कारवाई सुमारे एक कोटी 90 लाख 74 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.याबाबत गुन्हा दाखल असून पुढली तपास सुरु आहे.
सदर आदेशानुसार माहिती प्राप्त करीत असतांना दि 17 रोजी पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना गोपणीय माहिती मिळाली की,चार कंटेनर मध्ये कंटेनर क्रमांक १) एन.एल. ०१ ओ.सी. ८०९७ २) एच.आर. ५५ ओ.ई. ३१७७,३) एच.आर. ३८ डब्ल्यु ३२८३ व ४) एच.आर. ३८ वाय ९६४० या कंटनेरमध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटखा भरून मुंबई शहरात विक्री करण्याचे उद्देशाने वाहतुक करुन सदर कंटेनर दिल्ली येथुन निघुन धुळे जिल्हयातील हेंद्रुण-मोघण, मालेगाव मार्गे मुंबई येथे जात असल्याबाबत माहिती मिळाल्याने लागलीच पथकास सदर कंटेनरचा शोध घेवून कारवाई करणे बाबत आदेशीत केले होते.
सदर पथक कंटेनर वाहनांचा शोध घेत असतांना आर्वी गावाचे पुढे पुरमेपाडा गावाजवळ नमुद चारही कंटेनर एका मागे एक जात असल्याचे दिसल्याने पथकाने चारही कंटेनर थांबवून त्यावरील वाहनचालकांना त्यांची नाव गाव विचारता त्यांनी त्यांची नांवे १) साबिर मजिद खान रा. ग्राम घासेरा तहसिल जिल्हा नुहू हरीयाणा २) शकील अहमद लियाकत अली रा. ग्राम भडंगाका तहसिल जिल्हा नुहू ३) रुकमोद्यीन अयुब खान रा. ग्राम हिरवाडी तहसिल फिरोजपुर झिरका, जिल्हा नुहू ४) मुरसलिम रुजदार रा. ग्राम सोमकी तहसिल नगर जिल्हा भरतपुर ५) नसिम खान अली मोहम्मद खान रा. ग्राम अलीगड गुंडवास तहसिल-जिल्हा पलवल असे सांगितले. चालकांना त्यांच्या ताब्यातील कंटेनर मधील माला बाबत विचारपुस करता, त्यांनी उडवा-उडवीचे उत्तरे दिल्याने त्यांना कंटेनरसह मोहाडी नगर पोलीस ठाणेच्या आवारात आणले. सदर कंटनेरची तपासणी करता त्यात एक कोटी तीस लाख 49 हजार 280 किंमतीची फॉरके स्टार व एसएचके सुगंधीत पानमसाला तंबाखू 60 हजार रु. कि.चे एकुण चार कंटेनर व २५,०००/- रु.कि.चे वेगवेगळ्या कंपनीचे एकुण ०५ मोबाईल फोन असा एकूण एक कोटी 90 लाख 74 हजार 280 रु. किंमतीचा महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला सुगंधीत पानमसाला तंबाखु मुंबई शहरात विक्री करण्याच्या उद्येशाने वाहतुक करतांना मिळून आल्याने त्यांच्या विरुध्द धुळे तालुका पोलीस ठाणे येथे पोना/१३५७ गौतम राजेंद्र सपकाळे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
सदरची कारवाई प्रविणकुमार पाटील,पोलीस अधीक्षक, धुळे,प्रशांत बच्छाव,अपर पोलीस अधीक्षक,धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा.चे पो.निरी.शिवाजी बुधवंत, सपोनि प्रकाश पाटील,पोसई बाळासाहेब सुर्यवंशी, पोहेकॉ/रफिक पठाण, पोना/गौतम सपकाळे, पोना/राहुल सानप, प्रकाश सोनार, संदीप सरग, कैलास महाजन, संजय सुरसे अशांनी केली आहे.