
बातमी कट्टा:- धुळे येथील धडक कारवाईनंतर शिरपूर तालुक्यातील भेसळयुक्त दुध रोखण्यासाठी प्रशासनन सज्ज झाले असून जिल्ह्यातील पथकाने आज शिरपूरातील काही दुध डेअरींवर धाड टाकली आहे.अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली असून यात अन्न आणि औषध प्रशासन,जिल्हा दुग्धव्यवसाय विकास विभाग,पशुसंवर्धन विभाग आणि वजनमाप विभागाचे अधिकारींचे पथक तयार करण्यात आले आहे.

धुळे शहरात काही दिवसांपासून भेसळयुक्त दुध रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ही कारवाई सुरु असून यात अन्न आणि औषध प्रशासन,जिल्हा दुग्धव्यवसाय विकास विभाग,पशुसंवर्धन विभाग आणि वजनमाप विभागाचे अधिकारी व कर्मचारींचा समावेश आहे.धुळ शहरात आतापर्यंत मोठ्याप्रमाणात भेसळयुक्त दुधांवर कारवाई करण्यात आली आहे.यामुळे दुधात भेसळ करणाऱ्यांचे मात्र धाबे दणाणले आहे.धुळ्यात दुध डेअरींसह फेरीवाल्यांची दुधाची तपासणी करण्यात आली होती.
मात्र पथकाने आता शिरपूर तालुक्याकडे मोर्चा वळवला असून जिल्हा दुग्ध विकास व्यवसाय अधिकारी विजय गवळी,डॉ अमित पाटील,विस्तार अधिकारी प्रितेश गोंढळे, अन्न व औषध प्रशासन विभागातील बावीस्कर, भावसा,वजनमाप अधिकारी बि एन आरुळे, के, डी, पाटील, पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे ,संदीप माळी, यांच्या पथकाने काल सायंकाळी अचानक शिरपूर फाटा येथील दुध डेअरींवर धाड टाकली.यावेळी दुधाची गुणवत्ता,डेअरीवर दुध घेऊन येणाऱ्यांच्या कॅन मधील दुधाची गुणवत्ता व त्यासोबत दुधापासून बनविण्यात येणाऱ्या पदार्थांची तपासणी करण्यात आली.आज सायंकाळी कार्यवाहीला सुरूवात झाली असून दुधाच्या तपासणी नंतर येणाऱ्या अहवालात भेसळयुक्त दुधाची माहिती मिळणार आहे.