धुळ्यातील “क्राईम मिस्ट्री”, प्रियकराच्या मदतीने पतीचा खून करणाऱ्या पत्नी व तीच्या प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा

बातमी कट्टा:- प्रियकरासोबत सुरु असलेल्या अनैतिक संबधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नी व तीच्या प्रियकराने खून करुन तो मृतदेह कारच्या डिक्कीत ठेऊन तोरणमाळ येथे आणले व येथून सीताखाईत फेकुन पती बेप्ता झाल्याचा बनाव केला होता. एलसीबी पथकाने सखोल चौकशी करत पत्नी व तीच्या प्रियकराने त्याचा खून केल्याचे उघड झाले होते. मा.न्यायालयाने निकाल देत ठोस पुराव्यांसह आरोपपत्र, फॉरेन्सिक टिमचे सर्व पुरावे बघता न्यायालयाने पत्नी व तीच्या प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.

जुलै 2016 रोजी प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीचा खून करून नंतर त्याचा मृतदेह थेट तोरणमाळ येथील सिताखाईत फेकुन दिल्याची धक्कादायक घटना धुळे शहरातील शिवसागर कॉलनीत घडल्याचे उघडकीस आले होते. धुळे येथील भाजीपाला व्यापारी युवराज परदेशी हे दोन जुलै 2016 रोजी त्यांच्या पत्नी कोमल परदेशी हिच्या सोबत बाहेरगावी जाण्यासाठी घरातून निघाले होते.मात्र शिरुड गावजवळच त्याने पत्नीसह मुलांना पुन्हा घरी पाठवून दुसऱ्या वाहनाने निघुन गेला मात्र युवराज परदेशी घरी परत आले नसल्याची तक्रार पत्नी कोमल परदेशी हिने धुळे तालुका पोलीस स्टेशनात दिली होती.

युवराज परदेशी याचा घातपात झाल्याचा संशय असल्याचे युवराज परदेशी यांचा मोठा भाऊ दिपक परदेशी यांना होता.दिपक परदेशी यांनी या प्रकरणी तत्कालीन जिल्हा पोलीस अधिक्षक ए.चैतन्या यांची भेट घेऊन सदर प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेकडे दयावा अशी मागणी केल्यानंतर सदर प्रकरण स्थानिक गुन्हा शाखेच्या धुळे पथकाकडून समांतर तपास सुरु होता.यावेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने युवराज परदेशी यांच्या घरी व परिसरात पाहणी केली.सी.सी.टिव्ही तपासात असतांना युवराज परदेशी ज्या दिवशी बेपत्ता झाले तेव्हाच नेमका सी.सी.टिव्ही कॅमेरा बंद पडला असल्याने संशय वाढला.

पोलीसांनी सखोल तपास केला त्यावेळी युवराज परदेशी यांच्या पत्नी कोमल परदेशी हिचे प्रणिल मराठे सोबत प्रेमाची सुत जुळले असल्याची गोपणीय माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने प्रणील मराठेला ताब्यात घेत अधिक विचारपूस केल्यानंतर प्रणीलने सांगितले की,प्रणिल मराठे व कोमल परदेशी हे दोघे युवराज परदेशी याला घरात आढळून आले होते.यात वाद झाल्यानंतर झटापटीत प्रणिल मराठेने युवराजच्या दोक्यात लोखंडी सळईने वार करत खून केला. दुसऱ्या दिवशी कोमल व प्रणील मराठे यांनी कारच्या डिकीत युवराज परदेशी याचा मृतदेह ठेऊन तो तोरमाळ येथे आणून सीताखाईत युवराजचा मृतदेह फेकुन दिला असल्याची माहिती प्रणिल मराठे याने पोलिसांना दिल्यानंतर भर पाऊसात पोलिसांनी युवराज परदेशीच्या मृतदेहाचा शोध घेतला.यावेळी मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता.तो मृतदेह हिरे मेडिकल रुग्णालयात पाठवून तपास करण्यात आला होता. घटनेची फॉरेन्सिक पथकाने तपास केला असता.या घटने दरम्यान सर्व तपासणी केली होती. याबाबत ठोस आरोपपत्र तयार करुन न्यायालयात दाखल करण्यात आले होते.सर्व पुरावे,फॉरेन्सिक पथकाचे पुरावे पोलिसांनी बनविलेले आरोपपत्र बघरा न्यायालयाने आज निकाल देत कोमल व प्रणिलला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे.

कोमल हिचे प्रणिल मराठे रा.संगमा चौक याच्याशी प्रेमसंबध जुळले होते.मात्र यात पती युवराज परदेशी अडथळा ठरत असल्याने दोघांनी मिळुन युवराज परदेशीचा खून करून मृतदेह तोरणमाळ येथील सिताकाई घाटात फेकून दिल्याचे उघड झाले.याबाबत आता मा.न्यायालयाने ठोस पुराव्यांसह आरोपपत्र,फॉरेन्सिक टिमचे सर्व पुरावे बघता निकाल देत कोमल व तीचा प्रियकर प्रणिल मराठे यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.

WhatsApp
Follow by Email
error: