धुळ्यातील दहिहंडीत डिजेच्या तालावर पालकमंत्री गिरीश महाजन मनसोक्त थिरकले,सोबत आमदार जयकुमार रावल खासदार सुभाष भामरेंची उपस्थिती,

बातमी कट्टा:- धुळ्यातील दहीहंडी कार्यक्रमात डिजेच्या तालावर नाचण्याचा आग्रह झाल्यानंतर ग्रामविकास मंत्री व पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मनसोक्त नाचण्याचा आनंद लुटला यासोबतच आमदार जयकुमार रावल व खासदार सुभाष भामरे देखील उपस्थित होते.

बघा व्हिडीओ

धुळे शहरातील गरुड मैदानावर श्रीकृष्ण सांस्कृतिक मित्र मंडळाने दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केला होता.या दहीहंडीला ग्रामविकास मंत्री व धुळ्याचे पालकमंत्री गिरीश महाजन,खासदार सुभाष भामरे आमदार जयकुमार रावल व अभिनेत्री केतकी माटेगावकर, सुरभी हांडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

On YouTube

दहीहंडीत उपस्थितांकडून मंत्री महाजन यांना नाचण्याचा आग्रह करण्यात आला होता.आग्रहाखातर पालकमंत्री गिरीश महाजन डिजेच्या तालावर मनसोक्त थिरकले.यासोबतच आमदार जयकुमार रावलांनी देखील नाचण्याचा आनंद घेतला.

बघा व्हिडीओ
WhatsApp
Follow by Email
error: