बातमी कट्टा:- उत्तरप्रदेश येथील लखीमपुर खिरी येथील शेतकऱ्यांनावर वाहन चलावून चिरडून टाकल्याच्या घटनेचा निषेध नोंदवत दि 11 रोजी महाविकास आघाडी सरकारने बंदचे आवाहन केले आहे.धुळे येथे माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली याबाबत आज दि 9 रोजी सायंकाळी पत्रकारपरीषदेत आव्हान करण्यात आले आहे.
या पत्रकार परिषदेत म्हटले की उत्तरप्रदेश राज्यातील लखीमपुर खिरी येथील न्याय मागणारे शेतकऱ्यांना भाजपच्या योगी सरकार कडून चिरडून टाकल्याचा घटनेचा संपूर्ण देशभरात सर्व स्तरावरुन तिव्र निषेध करण्यात येत आहेत देशातील शेतकऱ्यांवर भाजपच्या केंद्र सरकार कडून व भाजपशाशीत राज्य सरकारकडून सातत्याने अन्याय अत्याचार होत आहे. भाजप सरकारचे हे कृत्य हे हिटलवर व मुसोलीनीला ही लाजवील असा प्रकार असुन लखीमपुर खिरी येथील शेतकऱ्यांवर सामुहिकरित्या ठार मारण्याची घटना जनरल डायरने केलेल्या हत्याकांडाची आठवण करुन देणारी आहे याप्रकारच्या विरोधात आवाज उठविणारे काँग्रेसच्या नेत्या प्रियकंआ गांधी यांना तुरुंगात डांबून इंग्रज राझवटीचा परिचय भाजप सरकारने करुन दिला आहे. अशा या क्रुर अत्याचारी भाजप सरकार विरुध्दात संपूर्ण देशभर आंदोलन सुरु आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने देखील सोमवार दि 11 ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्र बंदचे आव्हान केले आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या पक्षाने लखीमपुर खिरी येथील घटनेचा निषेध केला असुन या तीन पक्षाचे खासदार, आमदार विवध पदाधिकारी व धुळे येथीतील जनतेने दि 11 ऑक्टोबर रोजी महाविकास आघाडी कडूं जाहीर करण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद मध्ये सहभागी होऊन कडकडीत बंद पाळावे व महाराष्ट्र बंदचे आंदोलन यशस्वी करण्याचे आवहान यावेळी करण्यात आले.
या बैठकीला आमदार कुणाल पाटील शिवसेना सहसंपर्कप्रमुख महेश मिस्त्री, काँग्रेस जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर,महाराष्ट्र कॉंग्रेस सरचिटणीस युवराज करनकाळ,काँग्रेस शहर अध्यक्ष मा.आ.प्रा.शरद पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेस माजी जिल्हा अध्यक्ष किरण पाटील, शहर अध्यक्ष रणजित भोसले, काँग्रेस महीला जिल्हा अध्यक्ष गायत्री जयस्वाल, हेमंत मदाणे,एम.जी.धिवरे, कम्युनिस्ट पक्षाचे एल.आर.राव, रमेश श्रीखंडे, किरण जोंधळे,मुझफ्फर हुसेन,हसण पठाण, आप्पा खताळ, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष के.डी.पाटील, हरिश्चंद्र लोंढे, कम्युनिस्ट पक्षाचे पोपटराव चौधरी, बाजीराव पाटील, साहेबराव खैरनार, रितेश पाटील, पंढरीनाथ पाटील, अविनाश महाजन आदी उपस्थित होते.