धुळ्यात या अधिकारीने आयकर विभागाकडे स्वताच्या संपत्ती, मालमत्तेची चौकशी करण्याची केली मागणी,

बातमी कट्टा:- धुळ्यात मोर्चा काढून ज्या अधिकारीची मालमत्ता आणि व्यवहाराची चौकशी करण्याचे निवेदन देण्यात आले होते त्याच सा.महसूल अधिकारीने आयकर विभागाकडे प्रत देऊन स्वताच्या संपत्तीची आणि मालमतेची चौकशी करण्याची विनंती केली आहे.

धुळ्यात सा.महसूल अधिकारी सुरेश रकमाजी पाईकराव यांना मारहाण झाल्याची घटना घडली होती.या प्रकरणी अधिकारी सुरेश पाईकराव यांनी संबधीतांविरुध्द गुन्हा दाखल केला होता.या घटनेनंतर सा. महसूल अधिकारी सुरेश पाईकराव यांच्या विरूध्दात मोर्चा निघाला होता. मालमत्तेची आणि व्यवहाराची चौकशी करावी अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली होती.

यानंतर दि दि २४ रोजी सुरेश पाईकराव यांनी आयकर विभागाला पत्र दिले आहे.पत्रात म्हटले की माझ्या विरोधात मोर्चा काढून भ्रष्ट अधिकारी असल्याचे बोलण्यात आले.बदनामी करण्यात आले‌.वरीष्ठ अधिकारी यांच्यात प्रतिमा मलीन झाली आहे.त्यामुळे स्वता माझ्या संपत्तीची मालमत्तेची आयकर विभागामार्फत चौकशी करुन ती सर्वांसमोर जाहीर करण्यात यावे अशी विनंती सुरेश पाईकराव यांंनी आयकर विभागाकडे केली आहे.

WhatsApp
Follow by Email
error: