
बातमी कट्टा:- आज दिवसभर संपूर्ण खान्देशात नंदी महाराज दुध किंवा पाणी पित असल्याची चर्चा व त्या पध्दतीचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.याबाबत श्रध्दा म्हणून नागरिकांनी मंदीरात मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसून येत आहे.मात्र याबाबत अनिसने देखील सदर परिस्थितीचा आढावा घेऊन व्हिडीओ व्हायरल केला आहे.
मंदीरातील नंदीची मुर्ती दुध किंवा पाणी पित असल्याचा समज नागरिकांमध्ये आहे.यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.विशेष म्हणजे महिलांची मोठ्या प्रमाणात संख्या बघावयास मिळत आहे.या प्रकारा बाबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे धुळ्याचे अनिल साळवे यांनी देखील व्हिडिओ मार्फत माहिती दिली आहे.व्हिडीओतील हा विषय श्रध्देचा की अंधश्रध्दा असा प्रश्न उपस्थित होत आहे.