बातमी कट्टा:- नंदुरबार जिल्ह्यात ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळले आहेत. नंदूरबार शहरात ओमायक्रॉन चे दोन रूग्ण आढळून आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. चारूदत्त शिंदे यांनी दिली आहे.
नंदुरबार जिल्ह्यात ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळले आहेत.यात एकाचा स्वॅब दि 17 डिसेंबर रोजी घेण्यात आला होता तर एकाचा दि 29 डिसेंबर रोजी स्वॅब घेण्यात आला होता. त्या दोघांचा ओमायक्रॉन अहवाल आज पाॅझिटीव्ह प्राप्त झाला आहे.दोन्ही नंदुरबार शहरातील असून दोघानांही जिल्हा सामान्य रुग्णालयात ॲडमिट केलेले होते.आता दोघानांही डिस्चार्ज देण्यात आला आहे.दोघांनीही लसीकरणाचे दोन्ही डोस घेतले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कडून सांगण्यात आले आहे.