नंदुरबार लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे विरुध्द असणारे आता शिंदखेडा विधानसभेत भाजप विरुद्ध करताय राजकीय घुसखोरी ! आमदार जयकुमार रावलांची कशी असणार पुढील रणनीती?

बातमी कट्टा:- लोकसभा निवडणूकीत उत्तर महाराष्ट्रात भाजप पक्षाला जोरदार फटका बसला.धुळे आणि नंदुरबार लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाने बाजी मारली.खरतर तालुक्यात भाजपचे दिग्गज मंडळी असतांना कॉंग्रेस पक्षाचा झालेला विजय म्हणजे येथील भाजप पक्षाला चिंतन करण्यासारखे होते.आता विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु होणार आहे.आणि यात शिंदखेडा विधानसभा मतदार संघावर सर्वांचे लक्ष लागले आहे.कारण येथील भाजपचे उमेदवार आमदार जयकुमार रावल यांना महाविकास आघाडी सोबतच बाहेरील तालुका किंवा जिल्ह्यातील नेते मंडळींकडून असलेले आक्रमणासोबत लढावं लागणार आहे‌.

आमदार जयकुमार रावल हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे विश्वासू मधील एक नेते म्हटले जातात हेच इतर मंडळींना कदाचित सहन होत नसल्याने त्यांच्याकडून आमदार जयकुमार रावलांना निवडणुकीत टार्गेट करण्यात येईल अशी चर्चा रंगली आहे.यासाठी बाहेरील नेते मंडळींचे कार्यकर्ते देखील शिंदखेडा तालुक्यात राजकीय घुसखोरी करतांना दिसत आहेत.

आपण लोकसभा निवडणुकीत बघितले तर नंदुरबार लोकसभा निवडणुकीत ज्या नेत्यांचे विश्वासू महाविकास आघाडीच्या विरुध्दात भाजपमध्ये काम करत होते ते आता शिंदखेडा मतदार संघात महाविकास आघाडी सोबत काम करण्यासाठी सज्ज झाले आहेत.त्यापध्दतीने त्यांचे कार्य सुरु आहे.या राजकीय घुसखोरीचा आमदार जयकुमार रावलांना काही फरक पडतो का? हे तर येणारा काळच ठरवेल मात्र
यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आमदार जयकुमार रावल कशी रणनिती आखतात याकडे आता जनतेचे लक्ष लागून आहे.

WhatsApp
Follow by Email
error: