बातमी कट्टा:- विजेच्या तारांच्या शॉर्टशर्कीट मुळे ऊसाला आग लागल्याने सुमारे 9 एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना दि 10 रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे.कापणीला आलेला संपूर्ण ऊस जळून खाक झाल्याने अंदाजे नऊ लाखांचे नुकसान झाले आहे.

शिरपूर तालुक्यातील पिंपळे शिवारात तरडी रस्त्यालगत जवानसिंग शामसिंग राजपूत वय 60 भावेर व यांची वहिणी सुनंदाबाई गुतासिंग राजपुत यांंच्या एकुण 9 एकर क्षेत्रात ऊस लागवड केलेली आहे.ऊस लागवड असलेल्या वरील शेतगट क्षेत्रातुन महावितरणचे विज तार गेले आहेत.सदरचा ऊस पिक हा कापनीच्या अंतिप्त टप्यात होता.
आज दि 10 रोजी दुपारी ०१.३० वाजता शेतातील ऊस पिकाला अचानक आग लागली.घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी सर्वांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला परंतू आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीत पुर्णपणे ऊस जळून खाक झाला आहे.यात एकुण 9 एकर ऊस पिकाचे साधारण अंदाजे 9 लाख रुपये किंमतीचा ऊस जळून नुकसान झाला असून ही आग ही एम.एस.ई.बी.चे मेनलाईन ईलेक्ट्रीक पोल वरील तार अचानक शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची नोंद पोलीस स्टेशनात करण्यात आली आहे.