
बातमी कट्टा:- अतिक्रमीत बाजार उठवण्यासाठी शिरपूर नगरपरिषदेने रस्त्यावर पाणी सोडले.यामुळे खाजगी जागेत कपडे विक्रीसाठी बसलेल्या सुशिक्षित बेरोजगार तरुणाचे विक्रीसाठीचे कपडे खराब झाले.यामुळे तरुण संतापला आणि नगरपरिषद कर्मचारी अधिकारी आणि तरुणामध्ये वाद झाला.यात नेमकी चुकी कोणाची असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला.
व्हिडीओ वृत्तांतसाठी लिंक क्लिक करा https://youtu.be/QQUpfW3zYuw?si=aGj9nKovfpuIR1rO
कोरोना आजारानंतर अनेकांच्या हातातले काम हिसकावले गेले अनेकांच्या नोकरी असतील किंवा घरातील कर्ता कोरोना आजारामुळे गमवला. यामुळे आपण बघितले तर कोरोनापसून संसर्गानंतर अनेकांना आपल्या उदरनिर्वाहासाठी रस्त्यावर उतरावे लागले आहे.यापध्दतीनेच शिरपूर शहरातील शहादा रस्त्यावर करवंद नाका परिसरात दर सोमवारी मोठ्या प्रमाणात कपड्यांचा बाजार भरण्यास सुरुवात झाली.यामुळे अनेकांचा रोजगाराची सोय झाली.
बघा व्हिडीओ लिंक क्लिक करा https://youtu.be/QQUpfW3zYuw?si=aGj9nKovfpuIR1rO

मात्र हा बाजार भरतो तो अतिक्रमीत जागेवर ! आणि आता या बाजारात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने नगरपरिषदेकडून हा बाजार उठवण्यासाठी दर सोमवारी प्रयत्न करण्यात येत असतो.विशेष म्हणजे शिरपूर नगरपरिषदे कडून हा अतिक्रमीत बाजार उठवण्यासाठी अग्निशमन बंब द्वारे रस्त्यावर पाणी सोडण्यात येत असते.काल दि ११ रोजी सोमवारी देखिल शिरपूर नगरपरिषदेने अचानक अग्निशमन बंब द्वारे अतिक्रमीत बाजाराच्या रस्त्यावर पाणी सोडण्यात आले.मात्र यात खाजगी जागेवर कपडे विक्रीसाठी बसलेल्या सुशिक्षित बेरोजगार तरुणाच्या कपडे त्या पाण्यात भिजले.यामुळे तो तरुण प्रचंड संतापला आणि नगरपरिषदेच्या अधिकारी आणि त्या तरुणामध्ये शाब्दिक चकमक झाली.खाजगी जागेत कपडे विक्रीसाठी बसलेलो असतांना नगरपरिषदेने अग्निशमन बंबद्वारे सोडलेल्या पाण्यामुळे नवीन कपडे खराब झाल्याचा आरोप यावेळी त्यानी केला.
On YouTube https://youtu.be/QQUpfW3zYuw?si=aGj9nKovfpuIR1rO
शिरपूर शहरातील करंवद नाका परिसरात भरण्यात येत असलेल्या या अतिक्रमीत बाजार उठवण्यासाठी नगरपरिषदेला चक्क पाणी वाया घालव लागत असेल तर याला काय म्हणावं.एकीकडे संपूर्ण धुळे जिल्ह्यात दुष्काळाचे सावट आहे शिंदखेडा तालुक्यात तर १५-१५ दिवसांत पाणी मिळत आहे.काही ठिकाणी ठँकर द्वारे गावांना पाणी दिले जात आहे. आणि आपल्या शिरपूर नगरपरिषदेकडून फक्त अतिक्रमीत बाजार उठवण्यासाठी चक्क पाणी रस्त्यावर सोडण्यात येत आहे.
या दर सोमवारी भरत असलेल्या अतिक्रमीत बाजारात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने व तक्रारी होत असल्याने हा बाजार उठवण्यासाठी नगरपरिषदेकडून प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र मग यासाठी रस्त्यावर पाणी सोडून भर उन्हाळ्यात पाणी वाया घालण्याची काय गरज बर ?
बघा व्हिडीओ लिंक क्लिक करा https://youtu.be/QQUpfW3zYuw?si=aGj9nKovfpuIR1rO
फेरीवाल्यांच्या रोजगारवर अशा पध्दतीने पाणी फेरुन काय साध्य होणार आहे. या ठिकाणी अनेकांकडून आरोप करण्यात आलेत की फक्त ठरावीक अतिक्रमीत बाजार उठवण्यात येत असतो इतरत्र ठिकाणी अतिक्रमीत बाजार असतांना कारवाई का केली जात नाही ? आणि अतिक्रमीत बाजारवर कारवाईचा बळगा उगारत आहात तर मग नगरपरिषदेची पावती मार्फत पैसे का घेतले जातात ? असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.
On YouTube https://youtu.be/QQUpfW3zYuw?si=aGj9nKovfpuIR1rO
खाजगी जागेत असतांना नगरपरिषदेने सोडलेल्या पाणीमुळे तरुणाने विक्रीसाठी ठेवलेले कपडे पाण्यात भिजल्याने खराब झाले.ही भरापखी कोण देईल याबाबत कोणाकडे दाद मागू असा संतप्त सवाल यावेळी तरुणाने नगरपरिषदेच्या अधिकारींकडे केला.अतिक्रमीत जागेवर कपडे ठेवले खराब झाले असते तर मान्य केले असते मात्र खाजगी जागेवर असतांना विक्री साठी ठेवलेले कपडे खराब केल्याचा आरोप तरुणाने केला आहे.
खरतर नगरपरिषदेला कुठलेही राजकारण नकरता सरसकट अतिक्रमीत बाजार उठवायाचाच असेल तर अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यासाठी पाणी रसत्यावर सोडून पाणी वाया घालण्याची काही एक आवश्यकता नाही हे तेवढेच सत्य आहे.
On youtube https://youtu.be/QQUpfW3zYuw?si=aGj9nKovfpuIR1rO