बातमी कट्टा:- दोंडाईचा- येथील नगरपरिषद येथे दोन स्वीकृत नगरसेवक पद रिक्त होते. कोरोना प्रादुर्भावामुळे स्वीकृत नगरसेवक निवड प्रक्रिया प्रलंबित ठेवण्यात आली होती. आज सकाळी ११ वाजता सहकार महर्षी दादासाहेब रावल सभागृहात निवड प्रक्रिया करण्यात आली.
व या रिक्त पदांवर रावल परिवाराचे विश्वासू नरेंद्र वामनसिंग राजपूत, भाजपचे व धनगर समाजातील सामाजिक कार्यकर्ता ईश्वर बारकू धनगर यांची दोंडाईचा नगरपरिषद येथे सर्वानुमते निवड करण्यात आली यावेळी पीठासीन अधिकारी लोकनियुक्त नगराध्यक्षा नयन कुवर रावल यांनी या दोन्ही उमेदवारांचे स्वीकृत नगरसेवक म्हणून बिनविरोध निवड घोषीत केले. यावेळी उपनगराध्यक्ष नबू पिंजारी, मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम, माजी पाणीपुरवठा सभापती करणसिंग देशमुख, बांधकाम सभापती निखिल राजपूत, नगरसेवक नरेंद्र कोळी, नरेंद्र गिरासे, सुफियान तडवी, पाणीपुरवठा सभापती प्रतिनिधी प्रवीण महाजन, आरोग्य सभापती प्रतिनिधी कृष्णा नगराळे, भरतरी ठाकूर जितेंद्र गिरासे, खलील बागवान, राजेश जाधव, संजय तावडे, अनिल सिसोदिया आदी मान्यवर उपस्थित होते. निवड झाल्यानंतर स्वीकृत नगरसेवकांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले. सदर निवडीचे सर्व स्तरावरून अभिनंदन व शुभेच्छा दिल्या जात आहेत