
बातमी कट्टा:- नदीच्या पुलावरील कठड्याला दोरी बांधून पुलाखाली गळफास लावलेल्या स्थितीत शेतकऱ्याचा मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना आज दि 30 रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे.याबाबत शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर तालुक्यातील बाळदे येथील शेतकरी दिलीप नगराज पाटील वय 52 यांचा आज दि 30 रोजी पहाटे च्या सुमारास बाळदे जवळील अरुणावती नदी पुलाखाली गळफास लावलेल्या स्थितीत मृतदेह लटकलेला दिसून आला. रात्रीपासून घरातून बेपत्ता असल्याने यांचा सर्वत्र शोध सुरु होता मात्र त्यांचा पहाटेच्या सुमारास गळफास लावलेल्या स्थितीत मृतदेह मिळुन आल्याने नातलगांनी एकच आक्रोश केला.
शेतकरी दिलीप पाटील यांची बाळदे शिवारात पाच एकर शेती आहे. मात्र कोरोनाच्या पुर्वी पासुन निसर्गाने साथ न दिल्याने त्यांच्यावर कर्जाचे डोंगर उभे राहिले होते. अनेक दिवसांपासून ते कर्ज फेडण्याच्या चिंतेत होते. त्या विवंचनेतून यांनी गळफास घेऊन आपली जिवनयात्रा संपवल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली एक मुलगा असा परिवार होत.
