बातमी कट्टा:- आज दि 10 रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास नदी पुलावरुन नदीत उडी घेत तरुण शेतकऱ्याने आत्महत्याचा केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार आज दि 10 रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास शिरपूर तालुक्यातील कळमसरे येथील तरुण शेतकरी किरण उत्तम माळी वय 30 यांनी कळमसरे गावाजवळील अरुणावती पुलावरुन नदीत उडी घेत आत्महत्या केली आहे.नदीत उडी घेतल्याची माहिती प्राप्त होताच घटनास्थळी कळमसरे गावाच्या नागरिकांनी धाव घेत शोध कार्य सुरु केले होते. 4:45 वाजेच्या सुमारास किरण माळी यांना नागरिकांनी पाण्याबाहेर काढत तात्काळ रुग्णवाहीका बोलवून शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.त्याच्यावर उपचार सुरू होते.मात्र डॉक्टरांनी तपासणी करून किरण माळी यांना मृत घोषीत केले आहे.