
बातमी कट्टा:- धुळे शहराच्या मध्यभागी रहदारीच्या ठिकाणी आज दि 31 रोजी सकाळी पांझरा नदीपात्रातील पाण्यात पुरुष जातीचे मृत अर्भक वाहत असल्याचे आढळून आल्याची खळबळ जनक घटना घडली आहे. या मृत अर्भकाची पुर्ण वाढ झालेली नसून अर्भक नेमकं कुठून आलं ? आणि कोणी टाकले? याचा शोध पोलीसांकडून सुरु आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार धुळे शहरातील पांझरा नदी पात्रातील पाण्यात एक मृत अवस्थेत अर्भक वाहत असल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल होत त्या मृत अर्भकाला ताब्यात घेत वैद्यकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयात तपासणी साठी पाठविण्यात आले आहे. मृत अर्भक हे पुरुष जातीचे असून याची पुर्ण वाढ झालेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
मात्र धुळे शहराच्या मध्यभागी असलेल्या पांझरा नदीपात्रात वाहत असलेले हे मृत अर्भक नेमकं कुठून आलं ? आणि कोणी टाकले? याचा शोध पोलीस घेत आहेत. तपासणीनंतर अधिक माहिती देता येईल असं धुळे शहर पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.