नरभक्षक बिबट्याने घेतला तिसरा बळी, उपचारादरम्यान बालकाचा मृत्यू

बातमी कट्टा:- धुळे तालुक्यातील बोरी शिवारात नरभक्षक बिसट्याने बालकावर हल्ला करत गंभीर जखमी केल्याची घटना दि 26 रोजी पहाटेच्या सुमारास घडली होती. रूग्णालयात त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली असून उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.आतापर्यंत या नरभक्षक बिबट्याने हल्ल्यात तीन बालकांचा मृत्यू झाला आहे.

दि 26 रोजी धुळे तालुक्यातील बोरी परिसरात असलेल्या मोघण येथील धाडरे रस्त्यावरील शेतातील घरात रमेश नरसिंह दुडवे (पावरा) हा नऊ वर्षाचा मुलगा आपल्या कुटूंबासोबत झोपलेला असतांंना बिबट्याने अचानक त्याच्यावर हल्ला केला व त्याला शेतात ओढून नेण्याचा प्रयत्न केला.यावेळी त्याने आरडाओरड केल्याने जवळ झोपलेल्या कुटुंबीयांनी आरडाओरड केल्याने दक्ष नागरिकांनी धाव घेत आरडाओरड करत बिबट्याला पळवले आणि गंभीररीत्या जखमी असलेल्या रमेशला हिरे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचारासाठी दाखल केले होते. त्याच्या मानेवर बिबट्याने पंजा मारल्याने रमेशची प्रकृती गंभीर होती. उपचारादरम्यान रमेश चा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या नरभक्षक बिबट्याला ताब्यात घेण्यासाठी वनविभागाने या ठिकाणी पिंजरे व कॅमेरे लावले असून कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.मात्र बिबट्या अद्यापही मोकाट आहे.यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशती सोबत प्रचंड रोष निर्माण झालेला आहे. आतापर्यंत या नरभक्षक बिबट्याने तीन बालकांचा बळी घेतला आहे.

WhatsApp
Follow by Email
error: