बातमी कट्टा:- दवाखान्यात डॉक्टरने नर्स सोबत अंगलट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा शिरपूर शहर पोलीस स्टेशनात दाखल करण्यात आला असून डॉक्टरला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.याबाबत संघटनेकडून निवेदनाद्वारे घटनेचा निषेध नोंदवण्यात आला आहे.
शिरपुर शहरातील मांडळ रस्त्यावरील श्री सेवा हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या नर्सने शिरपूर शहर पोलीस स्टेशनात श्री सेवा हॉस्पिटलचे डॉक्टर नितीन वामनराव निकम यांच्यावरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादीत पीडित तरुणीने म्हटले की ती गेल्या दोन वर्षापासून श्री सेवा हॉस्पिटल येथे नर्स म्हणून कामास आहे.हॉस्पिटलचे डॉ.नितीन निकम हे मुद्दाम बेल वाजवून त्यांच्या केबिन मध्ये बोलावून अंगलगट करत अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केल्याबाबत शिरपुर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक छाया पाटील करीत आहेत.सोमवारी दुपारी डॉ नितीन निकम यास अटक करण्यात आली.
या घटनेची माहिती सर्वत्र पसरताच तालुक्यातील आदिवासी बांधव एकत्र येत शिरपूर शहर पोलीस स्टेशनात दाखल होऊन कठोर शिक्षा व्हावी याबाबत पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना निवेदन दिले.