नवरदेवाच्या कपड्यांचे पुढे काय होत ?

बातमी कट्टा:- लग्न आणि कपडे म्हणजे एक अतूट अस नातं…! लहानांपासून मोठ्यांपर्यंत लग्नात कोणते कपडे घालायचे यावरून दिर्घकाळ खलबते चालतात, चर्चा होते.आणि मग सर्वांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन पोशाख निश्चित केले जातात.


https://www.facebook.com/share/v/gqQSfAEe1iBSK9A6/?mibextid=zLoPMf

सध्या तर लग्नांना इव्हेंटचे स्वरूप आले आहेत, संगीत, मेहंदी, साखरपुडा ,हळद , वैदिक विवाह विधी आणि शेवटी लग्नाचा मुख्य समारंभ, अशा टप्पयात सलग तिन ते चार दिवस विवाह सोहळे साजरे करण्याकडे सर्वांचा कल आहे.



https://www.facebook.com/share/v/gqQSfAEe1iBSK9A6/?mibextid=zLoPMf

आता या समारंभाचा राजा म्हणजे नवरदेव… त्याचा तर थाट काही औरच असतो.त्यामुळेच त्याचे कपडेही अगदी शानदार असतात.पण इव्हेंटच्या या कपड्यांची प्रमुख समस्या म्हणजे लग्न समारंभ व्यतिरिक्त ते फारसे कुठे वापरता येत नाहीत. मग या कपड्यांचे होते तरी काय ? असा प्रश्न उभा राहतो.या प्रश्नांची उत्तरे शोधतांना शिरपूरच्या रस्त्यावर एक दृष्य नजरेला पडले,आणि आपसूकच पाय तिकडे खेचले गेले.

मोहन सुरेश लांडगे हे 40 वर्षीय गृहस्थ शिरपूर शहराच्या करवंद नाक्यावर कपडे विकतांना दिसले.त्यांनी लक्ष वेधून घेण्याचे कारण म्हणजे त्यांच्याकडचे कपडे साधे सुधे नसून अत्यंत उंची आणि अनेक नवरदेवांनी आपली लग्ने थाटात लावली असे भरजरी होते. शेरवानी, उंची कुडते, पठाणी, जोधपूरी, अशा एक ना अनेक फॅशनचे कपडे रस्त्यावर विक्री साठी घेऊन ते उभे होते.

व्हिडीओ बघण्यासाठी फेसबुक लिंक क्लिक करा https://www.facebook.com/share/v/gqQSfAEe1iBSK9A6/?mibextid=zLoPMf

काही काळापासून मोहन लांडगे हा व्यवसाय करीत आहेत त्यासाठी लागणारे कपडे ते मुंबई हून विकत घेतात.मुंबईला असे कपडे विकणारी फार मोठी बाजारपेठ आहे. अनेकदा तेथे वरपक्षाचे लोक येऊन कपडे घेतात.तो सूट ड्रायक्लिन करुन लग्नाच्या दिवशी वापरतात आणि टाकून देतात अशीही माहिती त्यांनी दिली.

खुद्द मोहन लांडगे यांच्याकडून ग्रामीण भागातील अनेक गरजू गरीब कुटूंबात लग्नासमारंभासाठी हे पोशाख विकत घेतले जातात.आणि त्यांच्यावर लग्न सोहळे उरकले जातात. शेवटी परिस्थिती कशीही असली तरी एक नुर आदमी दस नुर कपडा हे सर्वांच लागू होते.

व्हिडीओ बघण्यासाठी फेसबुक लिंक वर क्लिक करा
https://www.facebook.com/share/v/gqQSfAEe1iBSK9A6/?mibextid=zLoPMf

विशेष म्हणजे जूने असले तरी या कपड्यांची गुणवत्ता मात्र उत्तम आहे. त्यातील वैविध्य वाखाणण्याजोगे आहे.सध्या महानगरी क्षेत्रात लग्नाच्या दिवसासाठी व त्यापुर्वीच्या विधींसाठी कपडे भाड्याने देणारी दुकाने निघाली आहेत.लग्नानंतर घरात पडून राहणाये सुट पाहिले तर कपडे भाड्याने घेण्याची ही कल्पना किततरी व्यवहार्य वाटते. केवळ एका दिवसापुरता वापरले जातील अशा कपड्यांवर लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा ते भाड्याने घेतलेले काय वाईट असा विचार हळूहळू का होईना पण रुजतो आहे.

ग्रामीण भागात या कल्पनेला मूर्त स्वरूप यायला अद्याप अवकाश असला तरी मोहन लांडगे यांच्यासारखे विक्रेते पुरेशा संख्येने येऊ लागले तर लग्नांच्या कपड्यांबाबतचा हा ट्रेंड सुरु होण्यास फारसा वेळ लागणार नाही.

व्हिडीओ बघण्यासाठी फेसबुक लिंक क्लिक करा https://www.facebook.com/share/v/gqQSfAEe1iBSK9A6/?mibextid=zLoPMf

WhatsApp
Follow by Email
error: