बातमी कट्टा:- अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथील आदर्श शेतकरी योगेंद्रसिंग राजपूत यांच्या मुलाच्या विवाहाप्रसंगी चक्क नवरदेवाच्या गाडीलाच शेतकरी राजाच्या रथाचे प्रतीक असलेले बैलगाडेच चिन्ह व “शेतकरी” बैनर लावीत भावी अर्धांगिनिशी विवाह बंधनात होण्यासाठी रवाना झाले आहेत. यावेळी “मी आधी शेतकरी ,नंतर नवरदेव” असे म्हणत आज ता.15 रोजी विवाह बंधनात अडकले.
अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथील योगेंद्रसिंग राजपूत यांचा एकुलता एक मुलगा भुपेंद्रसिंग राजपूत हा वडिलांच्या शेती व्यवसाय जोपासत शिरपुर येथील जगदीशसिंग देशमुख यांच्या सुकन्या चि. सौ. का. हेमांगीदेवी हिच्याशी विवाह झाला.सदयस्थितित विवाह होताना नवरदेवाच्या गाडीला वेगवेगळे फिल्मी बैनर पाहायला मिळतात.मात्र आजच्या तरुणाईला यातून वेगळा संदेश मिळाल्याने नवरदेवासाठी सजवलेली ही मर्सिडीज गाडीवर बैल गाडीचे चिन्ह सर्वाना आकर्षण ठरले असून शेतकरी हाच जगाचा पोशिंदा याचा संदेश भुपेंद्रसिंग यांच्या विवाहातून दिला आहे.यामुळे अमळनेर तालुक्यापासून तर शिरपूर तालुक्यापर्यंत भुपेंद्रसिंग राजपूत यांचे कौतुक होत आहेत.