नव मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम

बातमी कट्टा:- नव मतदार नोंदणीसाठी शिरपूर तहसील कार्यालय व शिरपूर इनस्टिट्यूड ऑफ मैनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमानाने विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले.यावेळी १८ ते १९ वयोगटातील विद्यार्थींनी सहभाख नोंदवला.

आज दि १६ रोजी शिरपुर विधानसभा मतदारसंघ अंतर्गत तहसील कार्यालय शिरपुर व इन्स्टिट्युट ऑफ मैनेजमेंट शिरपुर यांच्या सयुक्त विद्यमाने शिरपुर येथे नव मतदार नोंदणी करण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते 

त्याप्रसंगी १८ ते १९वयोगटातील विद्यार्थी यांचे नाव मतदार यादीत नोंदविण्यासाठी ऑनलाइन फॉर्म बिएलओ यांच्या मार्फत भरण्यात आले आहेत.

तसेच यावेळेस विद्यार्थी याना मतदानाबत तसेच मतदार जागृति बाबत तहसीलदार महेंद्र माळी यांनी मार्गदर्शन केले. तसेच भरत चौधरी यांनी विद्यार्थी यांना वोटर हेल्पलाइन या ऐप बाबत सविस्तर माहिती दिली.शिक्षक मनोहर चौधरी यांनी मतदार जागृति बाबत विशेष गीत सादर करुन उपस्थित सर्वाची मने जिंकली .सदर मतदार नोंदणी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ वैशाली पाटिल ,मनोज पटेल,नायब तहसीलदार कुमावत यांनी प्रयत्न केले.

WhatsApp
Follow by Email
error: